कोपरखैरणेतील नागरिकांची संतप्त प्रतिक्रिया: विद्यमान खासदार-आमदारांवर नाराजी, अंकुश बाबा कदम यांच्याकडून आशेचा किरण

कोपरखैरणे, १२ ऑक्टोबर २०२४ – कोपरखैरणे परिसरातील नागरिकांची विद्यमान खासदार आणि आमदारांवरची नाराजी अगदी शिगेला पोहोचली आहे. वाढत्या प्रदूषण, अस्वच्छता, आणि सार्वजनिक सुविधा नसल्यामुळे येथील नागरिक त्रस्त झाले आहेत.



कोपरखैरणे रेल्वे स्थानकातील स्वच्छतागृहांच्या अस्वच्छ परिस्थितीमुळे प्रवाशांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. नागरिकांच्या मते, “आम्ही रोजच दुर्गंधीमध्ये प्रवास करतो, आरोग्याची कोणतीही काळजी घेतली जात नाही.” 


याव्यतिरिक्त, औद्योगिक क्षेत्रातील प्रदूषणाने येथील लोकांना श्वसनाच्या गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या अहवालानुसार, कोपरखैरणे आणि महापे परिसरात घातक रसायने, बेन्झीन आणि टोल्यून, यांचे प्रमाण प्रचंड आहे, ज्यामुळे गंभीर आजार निर्माण होत आहेत.


या परिस्थितीत नागरिकांच्या नाराजीला अंकुश बाबा कदम यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे उमेदवार अंकुश बाबा कदम यांनी नुकत्याच झालेल्या कोपरखैरणे दौऱ्यात लोकांना आश्वासन दिले, “तुमच्या समस्या माझ्याच आहेत, आणि मी यावर तातडीने काम करेन.” त्यांच्या या वचनबद्धतेमुळे आणि लोकांमध्ये त्यांच्या कामाची चांगली प्रतिमा असल्यामुळे त्यांच्यावर नागरिकांचा विश्वास वाढला आहे.


गणेश नाईक आणि त्यांच्या कुटुंबाने २५-३० वर्षं सत्तेचा आनंद घेतला, पण लोकांच्या मुलभूत समस्यांकडे त्यांनी लक्ष दिलं नाही. “सगळीच नाईक फॅमिली सत्तेत आहे, पण लोकांच्या समस्या कुठेच सोडवल्या नाहीत,” असे नागरिकांचे मत आहे. निवडणुका तोंडाजवळ आल्याअसल्या तरीही, नाईक कुटुंब अजूनही घरातूनच सगळा कारभार नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत आहेत, पण लोकांच्या समस्या प्रलंबितच आहेत. आता लोकांचा हा संताप मतपेटीतून बाहेर येईल, असं दिसत आहे.


नवा संवाद टीमने आज कोपरखैरणे परिसरातील नागरिकांच्या भावना आणि त्यांच्या समस्यांवर आवाज उठवला, आणि यामध्ये अंकुश बाबा कदम यांचा नेतृत्वात एक नवीन आशेचा किरण लोकांना दिसतो आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने