ठाणे व मुंबईत राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई, मद्य व भांग मिश्रित पदार्थांची वाहतूक करणाऱ्या आरोपींवर धडक कारवाई

ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा व मुंबईतील चेंबूर येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाने २६ ऑक्टोबर रोजी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत भारतीय बनावटीच्या विदेशी मद्याची तसेच परराज्यात निर्मित भांग मिश्रित पदार्थांची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर धाड घालण्यात आली.





मुंब्रा वळण रस्त्यावर मद्याची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई करून दोन आरोपींना अटक करण्यात आली, तर चेंबूरच्या सहकार नगर, लिंक रोड परिसरात भांग मिश्रित पदार्थांची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर करण्यात आलेल्या कारवाईत पाच आरोपींना अटक करण्यात आले.


या दोन्ही कारवायांमध्ये एकूण ५४ लाख ४८ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यात चेंबूर येथील कारवाईत ३५ लाख ७३ हजार ४०० रुपयांचा, तर मुंब्रा येथील कारवाईत १८ लाख ७५ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल समाविष्ट आहे.


राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या या कारवाईमुळे अवैध मद्य व भांग मिश्रित पदार्थांच्या वाहतुकीला मोठा फटका बसला आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने