रोहा, रायगडमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य मूर्तीचे अनावरण सोहळा संपन्न

रोहा, जि. रायगड येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पूर्णाकृती मूर्तीचा अनावरण सोहळा उत्साहात पार पडला. माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही शिवमूर्ती आणि ऐतिहासिक धाटणीचा स्मारक परिसर, शिवकाळाची आठवण जागवतो. रायगड जिल्ह्याच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्वाची साक्ष देणारे हे स्मारक, महाराष्ट्रातील शिवप्रेमींसाठी एक अनोखे पर्यटन स्थळ ठरणार आहे.









या सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे १३वे वंशज श्री संभाजीराजे छत्रपती, खासदार सुनील तटकरे, मंत्री आदितीताई तटकरे, रघुजीराजे आंग्रे, माजी आमदार अनिकेत तटकरे, तसेच शिवकालीन सरदार घराण्यांचे वंशज उपस्थित होते. रोहा नगरीतील शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभागी झाले होते. सर्व उपस्थितांनी शिवमूर्तीच्या अनावरण सोहळ्याला जोरदार प्रतिसाद दिला.

या स्मारकाची ऐतिहासिक धाटणी आणि मूर्तीची भव्यता छत्रपती शिवाजी महाराजांच्या महान कर्तृत्वाला आणि त्यांच्या नेतृत्वाला आदरांजली वाहते. अनिकेत तटकरे यांनी या संकल्पनेतून स्मारकाची उभारणी केली असून, शिवकाळ आणि मराठी संस्कृतीचे गौरवशाली वैभव जपणारे हे स्मारक भविष्याच्या पिढ्यांसाठी प्रेरणा ठरेल, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमादरम्यान, शिवकालीन सरदार घराण्यांचे वंशज आणि उपस्थित मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे स्मरण केले आणि त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचे उद्दिष्ट व्यक्त केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने