आज दिनांक 9 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता, लोकप्रिय खासदार आणि मुंबई अध्यक्ष प्रा. वर्षाताई गायकवाड यांनी वरळी हबचे जल अभियंता (हायड्रोलिक इंजिनियर) पुरुषोत्तम माळवढे यांची भेट घेतली. यावेळी शास्त्रीनगर, जांभळीपाडा, कोलेव्हरी व्हिलेज आणि बिग व्हिलेज या संपूर्ण परिसरातील पाणीपुरवठ्याच्या समस्येवर चर्चा करण्यात आली.
खासदार वर्षाताई गायकवाड यांनी या गंभीर समस्येवर तात्काळ उपाययोजना होण्यासाठी लेखी पत्र दिले असून, माळवढे साहेबांनी या कामाचे लवकरात लवकर समाधान करण्याचे आश्वासन दिले आहे. पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी संबंधित यंत्रणा आणि जल अभियंता सतत प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
गेल्या काही दिवसांपासून या परिसरातील नागरिकांना पाणीपुरवठ्याच्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या समस्येवर तातडीने कार्यवाही होण्यासाठी खासदार वर्षाताई गायकवाड पाणी खात्याशी वारंवार संपर्कात आहेत आणि संबंधित अधिकारीवर्गासोबत समन्वय साधत आहेत.
या प्रश्नाचा तातडीने निपटारा होईल अशी आशा व्यक्त करत, परिसरातील नागरिकांनी शांतता राखावी आणि लवकरच पाणीपुरवठा सुरळीत होईल याची ग्वाही खासदार वर्षाताई गायकवाड यांनी दिली आहे.