BMC ने सोमवारी, १८ ऑगस्ट २०२५ रोजी मुंबईतील सर्व शाळा आणि महाविद्यालयांच्या दुपारच्या सत्राला सुट्टी जाहीर केली आहे.
सकाळपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिका आयुक्त आणि प्रशासक श्री. भूषण गगरानी यांनी दुपारी १२ नंतर सुरु होणाऱ्या दुसऱ्या सत्रातील शाळा आणि महाविद्यालयांसाठी सुट्टी जाहीर केली आहे.
महानगरपालिकेने नागरिकांना आवश्यक असल्याशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन केले आहे. कोणत्याही मदतीसाठी किंवा अधिकृत माहितीसाठी BMCच्या नियंत्रण कक्षाच्या १९१६ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क करावा, असेही सांगण्यात आले.
भारतीय हवामान विभागाने मुंबई, ठाणे आणि रायगड या भागांसाठी १८ आणि १९ ऑगस्ट रोजी रेड अलर्ट जारी केला आहे. नागरिकांनी घराबाहेर पडण्यापूर्वी आवश्यक खबरदारी घ्यावी आणि अत्यावश्यक असल्यासच बाहेर जावे, असा सल्ला दिला आहे.
मुंबईत अत्याधुनिक पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, प्रशासनाने सर्वांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे