मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी गणरायाचे आगमन झाले आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी भेट देत गणपती बाप्पाचे दर्शन घेतले.राज्यातील गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरीही गणरायाचे आगमन झाले आहे. अशातच आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी भेट देत गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. त्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनीही कुटुंबास शिवतीर्थावर जात राज ठाकरेंच्या गणरायाचे दर्शन घेतले होते. त्यांतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरेंच्या घरी हजेरी लावली होती. या सर्व नेत्यांच्या हजेरीमुळे राजकीय वर्तुळातही चर्चा रंगली आहे.
- उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनी घेतलं बाप्पाच दर्शन
- आज दुपारी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या निवासस्थानी जात गणरायाचे दर्शन घेतले होते. यावेळी राज आणि उद्धव ठाकरे यांच्यात 10 मिनिटे चर्चाही झाली होती. जुलैमध्ये वरळी येथील मराठीच्या मुद्यावर हे दोन्ही नेते जवळजवळ 20 वर्षांनी मंचावर एकत्र आले होते. तेव्हापासून या दोन्ही नेत्यांची महापालिका निवडणुकीसाठी युती होणार असल्याचे बोलले जात आहे, मात्र याबाबत अद्याप घोषणा झालेली नाही. राज आणि उद्धव ठाकरे यांच्यातील जवळीक वाढलीवरळीतील कार्यक्रमानंतर राज आणि उद्धव ठाकरे यांच्यातील जवळीक वाढली असल्याचे दिसत आहे. यानंतर उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे हे मातोश्री वर गेले होते. त्यावेळी दोघांनीही बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोसमोर एकत्र फोटो काढले होते. त्यामुळे आगामी काळात हे दोन्ही नेते एकत्र येण्याची अटकळ बांधली जात आहे.देवेंद्र फडणवीसांचीही राज ठाकरेंच्या घरी भेटआज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शिवतीर्थवर जात राज ठाकरे यांच्या घरी विराजमान असलेल्या गणरायाचे दर्शन घेतले. तसेच संजय राऊत यांनीही शिवतीर्थावर जात गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. आजच्या या भेटींमुळे राजकारणावर फारसा प्रभाव पडणार नसला तरी राज्यातील नेते हे राज्याची संस्कृती जपत असल्याचे समोर आले आहे. आता पुढील काही दिवसांमध्ये इतरही नेते राज ठाकरेंच्या घरी गणरायाच्या दर्शनाला जाण्याची शक्यता आहे.