एमआयएमला राज्यात मोठा धक्का, पक्षाच्या टॉपच्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

 महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी समोर येत आहे, राज्यात एमआयएमला मोठा धक्का बसला आहे. एमआयएमच्या बड्या नेत्यानं तडकाफडकी राजीनामा दिला आहे. याचा मोठा फटका पक्षाला बसण्याची शक्यता आहे.

राज्यात महापालिका निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे.  महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, त्यातच आता मोठी बातमी समोर येत आहे. एमआयएमला राज्यात मोठा धक्का बसला आहे. एमआयएमचे प्रदेश कार्याध्यक्ष आणि सोलापूरचे शहराध्यक्ष फारूक शाब्दि यांनी पक्षाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. हा राज्यात एमआयएमला मोठा धक्का मानला जात आहे. एमआयएमचे नेते एम्तियाज जलील यांच्या नंतर फारुख शाब्दि हे एमआयएमचे राज्यातील दुसरे मोठे नेते आहेत. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्यामुळे पक्षाला मोठं खिंडार पडलं आहे.  सोलापूर शहर मध्य विधानसभेतून फारुख शाब्दि यांनी दोन वेळा निवडणूक लढवली होती, दोन्ही वेळेस फारुख शाब्दि हे दुसऱ्या क्रमांकावर होते.दरम्यान सूत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार शरद पवार यांच्या पक्षाचे दक्षिण मध्य मुंबईचे जिल्हाध्यक्ष आरिफ सय्यद देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे. तसेच राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या माजी नगरसेविका मनीषा राहाटे या देखील राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाने मुंबई महापालिकेत शिवसेना ठाकरे गट आणि मनसेसोबत युती केली आहे, त्यामुळे अनेक इच्छुकांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता आहे, या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी शरद पवार गटातून राष्ट्रवादी अजित पवार गटात मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे.मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटानं मनसे आणि शिवसेना शिंदे गटासोबत युती केली आहे. या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून 25 जागांचा प्रस्ताव देण्यात आला होता, मात्र सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी शरद पवार गटाला या निवडणुकीत 10 ते 12 जागा मिळण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने