टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील टी 20i मालिकेतील पहिल्या सामन्याच्या आयोजनाचा मान हा व्हीसीएला मिळाला आहे. या सामन्यात कोण जिंकणार? याकडे चाहत्यांचं लक्ष लागून आहे.
,भारताची विजयी सुरुवात, नागपूरमध्ये न्यूझीलंडवर 48 धावांनी मात
भारताने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात न्यूझीलंड विरुद्धच्या टी 20i मालिकेत विजयी सुरुवात केली आहे. भारताने नागपूरमध्ये न्यूझीलंडसमोर 239 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र न्यूझीलंडला 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 190 धावांपर्यंत पोहचता आलं. भारताने या विजयासह 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी मिळवली.न्यूझीलंडची पहिल्या टी 20i सामन्यात पराभवाच्या दिशेने वाटचाल सुरु झाली आहे. तर टीम इंडिया विजयी सलामी देणार असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. न्यूझीलंडच्या पराभवाची आता औपचारिकताच बाकी आहे, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. न्यूझीलंडने 239 धावांचा पाठलाग करताना 19 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 187 धावा केल्या आहेत.न्यूझीलंडला पाचवा झटका, सेट मार्क चॅपमॅन आऊट
वरुण चक्रवर्ती याने मार्क चॅपमॅन याला आऊट केलं आहे. भारताने यासग न्यूझीलंडला पाचवा झटका दिला आहे. वरुणने सेट मार्क चॅपमॅन याला अभिषेक शर्मा याच्या हाती कॅच आऊट केलं. चॅपमॅन याने 39 धावा केल्या.
21 Jan 2026 10:11 PM (IST)
IND vs NZ 1st T20i Live Score Updates : सेट ग्लेन फिलिप्स आऊट, न्यूझीलंडला चौथा धक्का, भारताचं कमबॅक
उपकर्णधार अक्षर पटेल याने सेट ग्लेन फिलिप्स याला आऊट करत भारताची डोकेदुखी घालवली आहे. अक्षरने ग्लेन फिलिप्स याला 14 व्या ओव्हरमधील तिसऱ्या बॉलवर शिवम दुबे याच्या हाती कॅच आऊट केलं. ग्लेनने 40 बॉलमध्ये 6 सिक्स आणि 4 फोरसह 78 धावा केल्या.
21 Jan 2026 09:58 PM (IST)
IND vs NZ 1st T20i Live Score Updates : ग्लेन फिलिप्सचं अर्धशतक, न्यूझीलंडच्या विजयाच्या आशा कायम
न्यूझीलंडच्या ग्लेन फिलिप्स याने 29 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं आहे. ग्लेनचं हे 11 वं टी 20I अर्धशतक ठरलं आहे. फिलिप्सच्या या खेळीमुळे न्यूझीलंडला विजयाची आशा कायम आहे.
