आज शनिवार, 28 सप्टेंबर 2024 रोजी, महाराष्ट्र शासनाच्या वतीने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई आयोजित 17 वर्षाखालील मुलांची तालुकास्तरीय बास्केटबॉल स्पर्धा अंधेरी येथील राजहंस विद्यालयात उत्साहात पार पडली. एकूण 22 संघांनी सहभाग घेतलेल्या या स्पर्धेत, विद्याभवन स्कूल नं. 2 च्या मुलांनी अंतिम सामन्यात सेंट ग्रेगोरीयस हायस्कूल, चेंबूरला 6 गुणांनी हरवून तालुकास्तरीय बास्केटबॉलचे अजिंक्यपद पटकावले.
विशेष म्हणजे, विद्याभवन स्कूल नं. 2 च्या संघाने 14 वर्षांखालील मुली, 17 वर्षांखालील मुली, आणि 17 वर्षांखालील मूले या तिन्ही गटातही तालुकास्तरीय विजेतेपद पटकावले आहे. संघाचे प्रशिक्षक श्री. सोनेश झोरे यांच्यासह सर्व विजेते खेळाडू अत्यंत कौतुकास पात्र आहेत. या यशाबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
विद्याभवन स्कूल नं. 2 च्या संघाने आपल्या अथक परिश्रमाने आणि दृढ निश्चयाने शाळेचे नाव उज्वल केले आहे. त्यांच्या या कामगिरीने उभ्या महाराष्ट्राचे लक्ष आता जिल्हास्तरीय स्पर्धेकडे वळले आहे. विजेत्या संघाला आगामी जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी खूप शुभेच्छा!