दिव्यांगाच्या आंतरशालेय नाट्य स्पर्धामध्ये " झाडे लावा 🌴 झाडे जगवा "ला प्रथम क्रमांक.🌹

बुधवार दि. 23/10/2024 रोजी ' नव क्षितिज संस्थेतर्फे डॉ. नीलिमा देसाई करंडक' दिव्यांगांच्या आंतरशालेय नाट्य स्पर्धा भरत नाट्य मंदिर पुणे येथे पार पडल्या. या वेळी "अभिराज फॉउंडेशन, वाकड येथील ऑटिझम मुलांच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी " झाडे लावा झाडे जगवा "हे नाटक सादर केले यावेळी झालेल्या विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट अभिनयाबद्दल प्रेक्षकांनी दाद दिली. या नाटकाला अंतर शालेय नाट्य स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळाला. सौ. वैशाली खेडेकर नाटकाचे दिग्दर्शन केले होते तसेच संगीत दिग्दर्शन श्री.ऋषिकेश मुसुडगे यांनी केले होते.तर सहाय्य योगिता वंजारी, विद्या रुपनाळकर. विनायक जुनवणे यांनी केले होते. शिवानंद मणीकरी, संतोष कोळी, समर्थ शेटे, आरुष धायगुडे, एकाश जोशी, सृष्टी आढाव, आराध्य ससाने यांनी नाटकांमध्ये अभिनय केला होता .या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. अनिता चव्हाण, डायरेक्टर सौ.स्वाती अभिजीत तांबे व श्री. रमेश मुसूडगे व पालकांनी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे विशेष कौतुक व अभिनंदन👑 केले आहे.





Post a Comment

थोडे नवीन जरा जुने