हजारो नवी मुंबईकरांच्या साक्षीने महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे अंकुश बाबा कदम यांनी परिवर्तन महाशक्तीच्या वतीने ऐरोली विधानसभेसाठी भव्य शक्तिप्रदर्शन करीत भरला उमेदवारी अर्ज

वाशी, घणसोली, ऐरोली - नवी मुंबईतील ऐरोली विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्र स्वराज्य पक्ष आणि परिवर्तन महाशक्तीचे उमेदवार अंकुश बाबा कदम यांनी आपल्या समर्थकांसह भव्य शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला. या प्रसंगी त्यांनी आपल्या आईचा आशीर्वाद घेत विजयी टिळक लावला आणि ‘सर्वसामान्यांचा आवाज बनून परिवर्तन घडविण्याची’ प्रतिज्ञा केली. त्यांच्या या पवित्र प्रवासात हजारो नवी मुंबईकरांनी पाठिंबा देत सोबत उभे राहिले.


उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी अंकुश बाबा कदम यांनी कोपरखैरणे येथील राहत्या सोसायटीतील गणेश मंदिरात श्री गणेशाचे दर्शन घेतले आणि पूजा-अर्चा करून विजयाची मागणी केली. ‘हे श्री गणेशा, मला जनतेच्या हितासाठी परिवर्तन घडविण्याचे सामर्थ्य दे’ अशी प्रार्थना त्यांनी केली. यानंतर त्यांनी आपल्या समर्थकांसह विजयाचा संकल्प केला.

शक्तिप्रदर्शनादरम्यान, वाशी सेक्टर १७ येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून अभिवादन करण्यात आले आणि रॅली पुढे ऐरोलीकडे मार्गस्थ झाली. ऐरोलीत उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर ही रॅली थांबली.

या ऐतिहासिक क्षणी युवराज शहाजीराजे छत्रपती देखील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांची उपस्थिती या प्रसंगाला आणखी एक ऐतिहासिक महत्त्व देते. त्यांनी अंकुश कदम यांना शुभेच्छा दिल्या आणि महाराष्ट्राच्या सन्मानासाठी, लोककल्याणासाठी झटण्याचे आवाहन केले.

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जमलेल्या हजारो समर्थकांनी अंकुश कदम यांचा उत्साहवर्धन केला. त्यांच्या या शक्तिप्रदर्शनाने ऐरोली विधानसभेतील वातावरण तापले आहे आणि या निवडणुकीत अंकुश कदम यांची उमेदवारी सशक्त ठरणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने