महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या ठाण्यातील मेळाव्यात युवकांचा जोश, पक्षात नव्या तरुणांची भरती

ठाणे, १० नोव्हेंबर २०२४: महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या युवक आघाडी, ठाणे जिल्हा यांनी काल ठाणे येथे भव्य पक्ष प्रवेश मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यात ५० हून अधिक तरुणांनी पक्षात प्रवेश घेतला आणि आपल्या सहभागाद्वारे महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या विचारधारेवर आपला विश्वास व्यक्त केला.



तरुणांनी छत्रपती संभाजी राजेंच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या “महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या” सुसंस्कृत विचारांना पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला. आई जगदंबेच्या कृपा आशीर्वादाने पक्षाच्या माध्यमातून लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक करणे आणि त्यांच्या हक्कांसाठी लढा देण्याचे वचन या युवकांनी दिले.


या कार्यक्रमात ठाणे युवा अध्यक्ष श्री. किरण मारुती जाधव आणि राज्य कार्यकारिणी सदस्य संतोष भाऊ कदम यांच्या हस्ते श्री. गणेश दळवी यांची कळवा (ठाणे) सहसंघटक म्हणून नियुक्ती करण्यात आली. या नेमणुकीमुळे ठाणे जिल्ह्यातील युवकांना नवी उमेद मिळाली आहे.


युवकांनी आपल्या भाषणात पुढील काळात “महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे” विचार गावोगावी आणि घराघरात पोहचवून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनुसार सुसंस्कृत स्वराज्य निर्माण करण्याचा संकल्प केला आहे. हा कार्यक्रम ठाणे युवा संपर्क कार्यालय, जांभळी नाका येथे पार पडला, ज्यामध्ये अनेक तरुण कार्यकर्त्यांचा उत्साह आणि जोश दिसून आला.


संपर्क: नवा संवाद, ठाणे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने