शेअर बाजारात गाडी ‘साइडवेज’ मोडमध्येच? फास्ट चालनार नाही हे पक्कं!

काय सांगता? शेअर बाजारात सध्या वेगाचा खेळ नाहीये, तर एकतर तुमची गाडी ‘साइडवेज मोड’मध्ये थांबली आहे असं समजा! चला, या रणनीतीवर एक नजर टाकूया आणि पाहूया की “साइडवेज मूव्हमेंट” म्हणजे नेमकं काय.


1. साइडवेज म्हणजे काय? – सध्या बाजार एका ठराविक “चॅनल” मध्ये अडकला आहे (उदा. निफ्टी 50 चा चार्ट, जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा बघा बरं).

2. काळजी करू नका, हे चॅनल मध्येच राहणार! – 80-90% वेळा बाजार या चॅनलमध्येच खेळेल; तुमच्यासारखं पब्लिकचं काय? वाट बघत बसायचं.

3. 10-20% वेळा चॅनलमध्ये नाही राहत मग काय करायचं? – अहो मग काय! आम्ही मोठ्या प्रमाणात खरेदी/विक्री करू. कारण, असं 10-20% वेळा होतंच.

4. चॅनल खाली तोडलं तर: – मोठ्या प्रमाणात खरेदी करणार.

5. वरची रेषा तोडली तर: – 20-30% शेअर्स विकून मोकळं होणार.

6. कधीपर्यंत ‘साइडवेज’ चालणार? – साधारण 2025-2026 पर्यंत. कारण कोणतेही मोठे इव्हेंट्स सध्या उरलेच नाहीत.

7. खोटं सुख मिळतंय, पण नका फसू – तुम्हाला इतर गुंतवणूक पर्यायांकडे वळण्याचा मोह होईल, पण नका जाऊ.

8. FD, PPF, बॉण्ड्स: – हे सगळं तुमच्या महागाईपेक्षा कमी परतावा देईल.

9. दहा वर्षांनी पाहा: – FD, PPF, Bonds मध्ये १० वर्षांनी तुमच्या धनसंपत्तीचं नक्कीच नुकसान झालेलं असेल.

10. तर मग काय करायचं? – ‘एशियन पेंट्स’ सारख्या चांगल्या शेअर्सना डिस्काउंटवर खरेदी करा, आणि थोडा वेळ थांबा (मी हे करतोय, पण ही खरेदीची सल्ला नाही).

11. डायव्हर्सिफिकेशन महत्त्वाचं: – थोडं gold असणेही गरजेचं आहे त्याच सोबत इतर गुंतवणुकीचे पर्याय ज्यामध्ये रियल एस्टेट प्रॉपर्टी पण येते.


थोडक्यातसाइडवेज मार्केटमध्ये तुम्ही पैसे कमवू शकता, फक्त (1) डिस्काउंटवर खरेदी करा, आणि (2) ते करण्यासाठी तुमच्याकडे ‘कॅश फ्लो’ असायला हवा.


“ग्रोथ मार्केट” मध्ये जो खेळ चांगला चालतो, तो आता फोल ठरताना दिसतोय. सध्या ही ‘value buy’ची वेळ आहे.


आणि हो, हे माझं मत आहे, मी चुकीचा ठरू शकतो. पण तरीही, माझं म्हणणं स्पष्टपणे सांगतोय. अधिक माहितीसाठी संपर्क साधा +91 92247 56311.



अस्वीकृती (Disclaimer):

वरील लेख फक्त सामान्य माहिती आणि शैक्षणिक उद्देशांसाठी आहे. हे कोणताही आर्थिक सल्ला, गुंतवणूक सल्ला, किंवा खरेदी/विक्रीची शिफारस नाही. शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करण्याआधी आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे. बाजारात गुंतवणूक करताना जोखीम संभवते आणि त्यामुळे तुम्हाला आर्थिक नुकसान होऊ शकते. वाचकांनी त्यांच्या स्वतःच्या संशोधनानुसार निर्णय घ्यावेत.


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने