नवी मुंबई, ५ नोव्हेंबर २०२४: गणेश नाईक यांच्या राजकीय साम्राज्यात लवकरच बिघाड होऊ शकतो. त्यांच्या मुलाने, संदीप गणेश नाईक यांनी काही आठवड्यांपूर्वीच NCP (SP) मध्ये प्रवेश केला आहे.
गणेश नाईक यांना पहिले अपयश आले ते संदीप नाईक यांच्यासाठी बीजेपीचे बेलापूर विधानसभेचे तिकीट आणण्यात आणि दुसरे अपयश संदीप नाईक यांना NCP (SP) पक्षात जाण्यापासून रोखण्यात. या खेळत नेहमीप्रमाणे शरद पवार यांनी बाजी मारून BJP ला शह दिला असा म्हणावे लागेल. स्थानिक नागरिकांच्या चर्चांमध्ये ऐकले जाते की जर राज्यात सत्तांतरण झाले आणि गणेश नाईक हरले तर ते कधीही NCP (SP) मध्ये सामील होऊ शकतात, कारण त्यांना आपल्या राजकीय शक्तीची आणि भविष्याची जास्त चिंता आहे.
ऐरोली विधानसभा २००८ मध्ये अस्तित्वात आली आणि संदीप नाईक येथे २००९ पासून आमदार आहेत, परंतु त्यांच्या या मोठ्या कार्यकाळात अनेक समस्या अद्याप सुटलेल्या नाहीत. कोपरखैराने आणि महापे येथे वायू प्रदूषणाचा गंभीर प्रश्न आहे, तसेच ऐरोली, घनसोली आणि रबाळे मधील झोपडपट्ट्या वस्तीतील नागरिकांना शौचालय, स्वच्छ पाणी आणि राशन वितरण सारख्या मूलभूत सेवांपासून वंचित राहावे लागत आहे. यावर्षीच्या मोसमी पावसामुळे नवी मुंबईत पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती, ज्यामुळे स्थानिक नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे.
याशिवाय, मुख्य रस्त्यांवरचा ट्रॅफिक व्यवस्थापनाचा प्रश्न देखील गंभीर आहे. नवी मुंबईत दिवसा आणि रात्री ट्रॅफिकमध्ये अडकणारे स्थानिक अस्वस्थ आहेत.
नाईक कुटुंबाने १५ वर्षांहून अधिक काळ नवी मुंबईवर सत्ता चालवली आहे, आणि गेल्या १० वर्षांत हे शहर चरस, गांजा आणि अमली पदार्थांच्या केंद्रस्थानी बदलले आहे, ज्यामुळे स्थानिक नागरिकांच्या मुलांच्या भवितव्याबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे.
स्थानिकांच्या मते स्पष्ट आहेत की संदीप नाईक या सार्वजनिक समस्यांना उत्तर देण्यात अपयशी ठरले होते, त्यामुळे ते बेलापूर विधानसभेकडे पाळले. त्याचप्रमाणे गणेश नाईक ऐरोली विधानसभेत आले, जेणेकरून नवी मुंबई पुन्हा नाईक कुटुंबाच्या ताब्यात येईल. राजकारणातील बदल आणि समस्यांची गर्दी नागरिकांच्या चर्चेत सदैव उपस्थित आहे त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत मतदारांनी सर्व समस्यांचा विचार करून योग्य तो जमिनीवरचा माणूस आमदार म्हणून निवडून विधानसभेत पाठवावा जो मतदारसंघातील सर्व विषय योग्य रीतीने मांडून त्यावर समाधान शोधू शेकन.