ऐरोलीत अंकुश कदम यांचा जादुई संपर्क; महायुतीच्या बंडखोरीवर चिमटा

नवी मुंबई: १५०-ऐरोली आणि १५१-बेलापूर विधानसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीत इच्छुकांना उमेदवारी न मिळाल्याने उभी फूट पडली आहे. शिंदेच्या शिवसेनेचे विजय चौगुले व विजय नाहटा यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली, परंतु अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी (ता. ४) त्यांनी बंडखोरी कायम ठेवली आहे. त्यामुळे दोन्ही मतदार संघातील महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांसमोर या अपक्षांचे तगडे आवाहन उभे ठाकले आहे.



बेलापूर मतदारसंघातून अपक्ष अर्ज भरलेल्या माजी उपमहापौर अशोक गावडे यांनी माघार घेतली आहे, तसेच सकल मराठा समाजाने निवडणुकीतून माघार घेतल्याने विनोद पोखरकर व डॉ. अमरदीप गरड यांच्यासारखे अपक्ष उमेदवारही मागे हटले आहेत. त्यामुळे ऐरोली व बेलापूर विधानसभा मतदारसंघात रंगतदार लढत होणार आहे, जिथे महायुती आणि महाविकास आघाडी समोर नाराज अपक्ष नेत्यांचे आवाहन असेल.


ऐरोली विधानसभा मतदारसंघात महायुतीतील (भाजप) गणेश नाईक, महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे अंकुश (बाबा) कदम, महाविकास आघाडीतील (उबाठा) मनोहर मढवी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे निलेश बाणखेले, आणि अपक्ष उमेदवार विजय चौगुले (निशाणी कुकर) यांच्यात तगडी लढत होणार आहे.


बेलापूर विधानसभा मतदार संघात, विजय नाहटा अपक्ष (निशाणी शिट्टी) म्हणून लढत आहेत, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या संदीप नाईक, महायुतीतील मंदा म्हात्रे, आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गजानन काळे यांच्यात सामना रंगणार आहे.


नवी मुंबईतील राजकारण प्रचंड तापले आहे, विशेषतः शिवसेना आणि भाजपमधील संबंध ताणले गेल्याने. ऐरोली मतदार संघाचे भाजप उमेदवार गणेश नाईक यांचे वक्तव्य की “१९९९ मध्ये काहींनी मला चीटींग करून हरवले,” यावर विजय चौगुले यांनी प्रतिक्रिया देत गणेश नाईक यांच्यावर जोरदार टीका केली आहे. शिवसैनिक तोंडाला काळी पट्टी बांधून निषेध आंदोलन करत आहेत.


अंकुश कदम आपल्या लोकांमध्ये चांगला संबंध निर्माण करून जोरदार उभा राहिला आहे, ज्यामुळे महायुतीची दारे पुन्हा उघडून ठेवण्याची शक्यता कमी झाली आहे. हे लक्षात घेऊन, विजय चौगुले यांनी या निवडणुकीत आपले अस्तित्व सिद्ध करण्यासाठी “आता माघार नाही” असा इशारा दिला आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने