मुंबई, ७ नोव्हेंबर, २०२४: मुंबईच्या मुलुंड पश्चिमेतील नाहूर रोडवरील गवणीचा गोविंदा पथकाने, गड-किल्ले बांधण्याच्या त्यांच्या परंपरेला पुढे नेत, यंदा (कोरोनाची २ वर्षे वगळून) चौथ्या वर्षी ‘तिकोना गडाची’ प्रतिकृती साकारली आहे. पथकाने परंपरागत पद्धतीने २०२४ साली हे कलात्मक कार्य पूर्ण केले असून, प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही त्यांनी किल्ल्याच्या मूळ रचनेला सलाम करीत त्याची हुबेहुब प्रतिकृती उभारण्याचा प्रयत्न केला आहे.
गवणीचा गोविंदा पथकातील सदस्यांचा किल्ले बांधण्यामागे एक खास अभ्यास आणि समर्पण असते. प्रतिकृती बनवण्यापूर्वी, जो गड-किल्ला ते बांधणार असतील त्या किल्ल्याला ते स्वतः प्रत्यक्ष भेट देतात. त्या किल्ल्याची संपूर्ण रचना, तटबंदी, प्रवेशद्वार, गडाचे स्थानिक वैशिष्ट्ये या सर्व गोष्टींवर बारकाईने लक्ष केंद्रित करून अभ्यास करून, गड-किल्ल्याची प्रतिकृती ते साकारण्याचा निर्धार करतात.
गवणीचा गोविंदा पथकातील सदस्यांनी यंदाही अतिशय मेहनतीने तिकोना गडाचा अभ्यास करून त्यावरील प्रत्येक बारकाईची नोंद घेतली आहे. किल्ल्याचा खरा आकार, त्याच्या टोकाचा विशेष आकार, आणि किल्ल्याच्या रचनेतील वेगवेगळ्या अंगांचा अभ्यास करून ते हुबेहुब प्रतिकृती घडवली आहे. यासाठी त्यांच्या मेहनतीत, निष्ठेत, आणि कलात्मकतेत कधीही तडजोड करत नाहीत. त्यांचा उद्देश प्रत्येकाला गड-किल्ल्यांचे महत्त्व, संस्कृती आणि इतिहासाची माहिती देण्याचा आहे.
गावणिचा गोविंदा पथकाचे हे प्रयत्न आजच्या पिढीला आपल्या इतिहासाचा वारसा सांगणारे आहेत.