🏆 "अभिराज फॉउंडेशन "ची दिव्यांग क्षेत्रात लक्षणीय कामगिरी. 🥉🥉🥉🥉🥉🥉🥉🥉

पुणे: "अभिराज फाउंडेशन" वाकड पुणे ही संस्था ऑटिझम व बौद्धिक अक्षम विद्यार्थ्यांसाठी शाळा व कार्यशाळा चालवीत असून विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात अतुलनीय अशी कामगिरी केली आहे.






6 डिसेंबर 2024 रोजी "पुणे सेवासदन दिलासा "कार्यशाळेच्या वर्धापन दिनानिमित्त घेण्यात आलेल्या दिव्यांगांच्या योगासन स्पर्धेमध्ये कु. संतोष कोळी यांनी सिल्वर पदक मिळवले. विजेत्यांना जिल्हा परिषद पुणे दिव्यांग शाखा येथील अधिकारी श्रीमती देशपांडे मॅडम यांच्या हस्ते गौरवण्यात आले.या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले होते श्रीमती विद्या रुपनाळकर यांनी.
तसेच जागतिक दिव्यांग दिना निमित्ताने दिव्यांग मुलांसाठी शिक्षण,कला, क्रीडा आणि संगीत या क्षेत्रात अतुलनीय कार्य करणाऱ्या विशेष शिक्षकांचा गौरव 9 डिसेंबर 2024 रोजी "नवक्षितिज " या संस्थेच्या वतीने     
 करण्यात आला यावेळी "अभिराज फाउंडेशनच्या "सौ. भाग्यश्री दत्तात्रय कापसे व सौ. स्मिता दशरथ हांडे यांचा सत्कार श्री. प्रतापराव पवार यांच्या हस्ते करण्यात आला. या गौरवाबद्दल अभिराज फौंडेशनचे ट्रस्टी सौ. स्वाती तांबे व श्री रमेश मुसूडगे व सल्लागार श्री.अभिजीत तांबे, संस्थेच्या मुख्याध्यापिका अनिता चव्हाण यांनी सर्वांचे अभिनंदन केले आहे.🌹👏

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने