“अभिराज फाऊंडेशनला” दिव्यांगांच्या क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय यश

शनिवार, ११ जानेवारी २०२५ रोजी “युवा ऑलिम्पिक २०२५” भारतीय सैन्य दिनाच्या निमित्ताने मस्के टीयर्स युथ फाऊंडेशन आणि सेवा विश्वंम फाउंडेशनच्या वतीने निगडी येथील मदनलाल धिंग्रा क्रीडांगणावर दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी मैदानी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. बौद्धिक अक्षम व ऑटिझम असलेल्या विद्यार्थ्यांसाठी या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.



यामध्ये अभिराज फाऊंडेशन, वाकड, अनिकेत सेवाभावी संस्था, आशा स्कूल, ब्रह्मदत्त विद्यालय निगडी, सोफेश तारा फाउंडेशन (गुरव पिंपळे), वृक्षवेल संस्था (भोसरी) अशा सहा शाळांतील एकूण ७६ दिव्यांग विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. १०० मीटर रनिंग, ५० मीटर रनिंग, सॉफ्ट बॉल थ्रो, गोळाफेक, क्लब थ्रो, आणि स्टॅंडिंग जंप यांसारख्या विविध क्रीडा प्रकारांमध्ये विद्यार्थ्यांनी आपले कौशल्य दाखवले.


या क्रीडा स्पर्धेच्या बक्षीस वितरणाचा शुभारंभ सेवा विश्व ग्लोबल फाउंडेशनच्या कार्यकारी संचालिका दिव्या वाजपेयी, माजी सैनिक श्री. भोसले, आणि अभिराज फाउंडेशन वाकडचे संचालक श्री. रमेश मुसुडगे यांच्या हस्ते करण्यात आला.


अभिराज फाऊंडेशन वाकडच्या विद्यार्थ्यांनी १२ सुवर्णपदके, ९ रौप्यपदके, आणि ८ कांस्यपदके जिंकत शानदार कामगिरी केली. या उल्लेखनीय यशासाठी संस्थेच्या संचालिका सौ. स्वाती तांबे आणि मुख्याध्यापिका सौ. अनिता चव्हाण यांनी विद्यार्थ्यांचे तसेच क्रीडा शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.


स्पर्धेचे यशस्वी नियोजन श्री. नरेंद्र अहिरे, वैभव, आणि अभिराज फाउंडेशनचे क्रीडा शिक्षक श्री. विकास जगताप, श्री. ऋषिकेश मुसुडगे, योगेश आढळे आणि कुणाल गायकवाड यांनी केले.


या प्रकारच्या उपक्रमांमुळे दिव्यांग विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढतो आणि त्यांना स्वतःची क्षमता दाखवण्याची संधी मिळते, असे मत आयोजकांनी व्यक्त केले.






Post a Comment

थोडे नवीन जरा जुने