महाराष्ट्र स्वराज्य पक्ष नवी मुंबई जिल्हाध्यक्ष उमेश जुनघरे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबिराचे यशस्वी आयोजन

नवी मुंबई, १९ जानेवारी, २०२५: जिल्हा अध्यक्ष आणि महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे झुंजार शिलेदार मा. श्री. उमेश भाऊ जुनघरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, समाजहितासाठी अभूतपूर्व उपक्रम राबविण्यात आला. “रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा” या प्रेरणेने, डी.वाय. पाटील हॉस्पिटल व संशोधन केंद्र, नेरूळ यांच्या सहकार्याने सावित्रीबाई नगर, गणपती पाडा, दिघा येथे भव्य नि:शुल्क आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.


दिनांक १९ जानेवारी २०२५ रोजी, रविवार, सकाळी ९ वाजल्यापासून संध्याकाळी ६ वाजेपर्यंत चाललेल्या या आरोग्य शिबिरात हजारो नागरिकांनी सहभाग नोंदवला. या शिबिरामध्ये नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी, ई-श्रम कार्ड, आयुष्मान कार्ड तयार करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.


या विशेष प्रसंगी महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे राज्य उपाध्यक्ष मा. श्री. अंकुश बाबा कदम उपस्थित होते. त्यांनी उमेश भाऊंच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात पहिला केक भरवत त्यांच्या कार्याची प्रशंसा केली.


समाजासाठी योगदानाची परंपरा

मा. श्री. उमेश भाऊ जुनघरे हे नवी मुंबईतील सामाजिक समस्यांवर प्रभावीपणे काम करणारे कर्तव्यदक्ष नेते म्हणून प्रसिद्ध आहेत. समाजातील गरजा ओळखून त्या सोडविण्यासाठी कृती आराखडा तयार करणे, तो अंमलात आणणे, तसेच नोंदणीच्या पाठपुराव्याद्वारे समस्यांचे निराकरण करून घेणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे.

त्यांनी अनधिकृत शाळांविरोधात आंदोलन उभारून, तसेच हजारो कष्टकरी कामगारांसाठी श्रमकार्ड मिळवून देण्यासाठी घेतलेला पुढाकार याला समाजातून मोठा प्रतिसाद मिळाला आहे.


वाढदिवसाचा जल्लोष आणि हजारो शुभेच्छा

मा. श्री. उमेश भाऊ जुनघरे यांच्या वाढदिवसानिमित्त मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात कार्यक्रम पार पडला. भव्य आतषबाजी, शेकडो कार्यकर्ते आणि शुभचिंतकांच्या उपस्थितीत वाढदिवसाचा जश्न साजरा करण्यात आला. त्यांच्या कार्यकर्तृत्वाला सलाम करणारे हजारो कार्यकर्ते या सोहळ्याला साक्षीदार झाले.


“आपल्या कार्यातून समाजहिताचे काम करत राहण्याची प्रेरणा मिळते. तुमची सेवा हीच माझ्यासाठी खरी भेट आहे,” असे उद्गार उमेश भाऊ यांनी या प्रसंगी काढले.


समाजहिताच्या सेवेसाठी अविरत प्रयत्न

मा. श्री. उमेश भाऊ जुनघरे आणि त्यांच्या महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या कार्यकर्त्यांनी समाजसेवेचे ध्येय सतत पुढे ठेवले आहे. वाढदिवसाच्या या निमित्ताने नवी मुंबईत घेतलेला हा आरोग्य शिबिराचा उपक्रम त्यांच्याविषयीची लोकांची निष्ठा आणि विश्वास दृढ करणारा ठरला आहे.




















 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने