महाराष्ट्राचा नवा संवाद दिनांक :१७/०८/२०२५
जळगाव : आदिवासींचे अनेक प्रश्न वर्षानुवर्षांपासून प्रलंबित असताना त्यांची तत्काळ सोडवणूक करण्यासाठी संबंधित खात्याचे मंत्री तसेच अधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन मंत्रालयात करण्यात येईल. आदिवासींच्या विकासासाठी निधीची कमतरता भासल्यास विधिमंडळाच्या आगामी अधिवेशनात त्याकरीता विशेष तरतूद करण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे केली.
जळगावमधील शिवतीर्थ मैदानावर समृद्ध खान्देश संकल्प आणि पक्ष प्रवेश मेळाव्याचे आयोजन रविवारी करण्यात आले. त्यात खान्देशात वास्तव्यास असलेल्या आदिवासी समुदायाच्या प्रश्नांवर बोलताना उपमुख्यमंत्री पवार यांनी त्यांच्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आपण यापुढे कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली. सत्ता केवळ मिरवण्यासाठी नसते तर आदिवासींसह दलित, वंचित आणि बहुजनांचे प्रश्न सोडविण्यासाठी असते, असेही ते म्हणाले. व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) ज्येष्ठ नेते तथा मंत्री छगन भुजबळ, नरहरी झिरवळ, माणिकराव कोकाटे, आमदार अनिल पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, डॉ. सतीश पाटील, माजी आमदार कैलास पाटील, मनीष जैन, अजित पवार गटाचे जळगाव लोकसभा क्षेत्राचे जिल्हाध्यक्ष संजय पवार, रावेर लोकसभा क्षेत्राचे जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे, जळगाव शहर अध्यक्ष अभिषेक पाटील, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष कल्पना पाटील आदी उपस्थित होते.प्रतिभा शिंदे यांनी केलेल्या मागण्यांच्या अनुषंगाने मंत्रालयात ऑगस्ट महिनाअखेर किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात बैठकीचे आयोजन करण्याचे सूतोवाच उपमुख्यमंत्री पवार यांनी केले. आदिवासी किंवा इतर घटकांचे प्रश्न सोडविण्यासाठी तातडीने कार्य
वाही करण्याचे निर्देशही त्यांनी मंत्री झिरवळ यांच्यासह कोकाटे यांना व्यासपीठावरून दिले. मंत्री छगन भुजबळ यांनी केंद्र सरकारच्या जात गणनेचे समर्थन करतानाच ओबीसींसह दलितांसाठी सध्या जसे आरक्षण आहे तसे ते कायमठेवण्याची गरज व्यक्त केली मंत्री झीरवळ यांनी ही गायरणावर राहणाऱ्या आदिवासी ना शासकीय योजनाचा लाभ मिळावा म्हणून प्रयन्तशील असल्याची यांनी प्रास्ताविक केली संजय पवार यांनी आभार मानले