बंदोबस्ताला असलेल्या पोलीस भगिनींचे मनोगत

 *दुसऱ्या दिवशी मैदानात कोणीही नव्हतं हे पाहून डोळे पाणावले


मी महिला पोलीस, मुंबई. मला मराठयांविषयी माझे मनोगत व्यक्त करावेसे वाटते.

महाराष्ट्राचा नवा संवाद प्रतिनिधी :चंद्रकांत पाटील

राठे मुंबईत आले होते त्या दिवसापासून मला आझाद मैदानजवळ बंदोबस्त ड्युटी लागली होती. पहिल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी मराठा मावळ्यांचे प्रचंड हाल झाले कारण मुंबई मधील हॉटेल व दुकाने बंद होती. नंतर गावाकडून त्यांना जेवणाची सोय झाली. काही मावळे पहिल्या दिवसापासूनच गॅस, तांदूळ, पीठ ही सोय करून आले होते. ते हे ठरवूनच आले होते की आरक्षण घेतल्याशिवाय माघारी जायचे नाही. 


छत्रपती शिवाजी महाराज युद्ध लढण्यासाठी जायचे तेव्हा त्यांना आपण परत कधी येणार हे माहीत नसायचे. ते गरजेचे सर्व साहित्य सोबत घेऊन जायचे. तसेच ही गावकरी मंडळी आली होते. पण भरपूर लोक हे रेल्वेने आल्यामुळे त्यांची खाण्याची सोय झाली नाही. त्यांच्यातील प्रत्येक व्यक्तीने महिलांचा मान सन्मान केला. गर्भवती महिला असो किंवा वयस्कर महिला पुरुष असो कितीही गर्दी असो त्यांना जाण्यासाठी रस्ता दिला. महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीने सोशल मीडियावर बघितल असेल गावाकडून आणलेली भाकरी मुबाईकरांना खा तर बोललेच परंतु मायेने त्यांच्या मुखात घास सुध्दा भरवला. पत्रकार असो मुंबई पोलीस असो त्यांनी गावाकडचा ठेसा-भाकरी, चटणी आणि लोणच्याचा स्वाद घेतला. मी कर्तव्यावर असताना मला सुद्धा त्या जेवणाचा छान असा सुगंध येत होता. 


जे काही मराठे मुंबईत आले होते त्यांच्याकडून जी काही अस्वच्छता झाली होती ती त्यांनी स्वतः स्वच्छ केली. त्यांच्याकडून एक शिकायला भेटले की माणसाने प्रत्येक दुःखात आंनद शोधला पाहीजे. भरपूर जणांच्या गावाकडे अडचणी होत्या. कोणाचे गाई ढोरे उपाशी तर कोणाची पत्नी गर्भवती होती, तर कोणाचे बाळ छोटे होते, तर कोणाचे आईवडील वयोवृद्ध होते. त्यांना सगळ्यांना सोडून ते मुंबईत आले आणि त्यांनी त्याच्यात आनंद शोधला. प्रत्येक व्यक्ती पोलिसांना हात जोडूनच नमस्कार करायचा हीच गावाकडची संस्कृती आहे. त्यांनी महाराष्ट्राचे सगळे खेळ मुंबईकरांना दाखवले. 


नांदेड मधील एका काकांशी माझं बोलणं झालं तेव्हा त्यांनी मोबाईल मध्ये त्यांच्या नाताचा फोटो दाखवला. त्यांचा नातू त्यांना बोलला, "बाबा आरक्षण भेटल का?" हे ऐकून तर माझ्या डोळ्याला धारा लागल्या. तेव्हा सोबतच्या माणसांनी मला सावरलं. मला सावरताना सहकाऱ्यांचे सुद्धा सुद्धा डोळे पाणावले होते. यावरून आपल्याला समजते की मराठ्यांना आरक्षणाची किती गरज आहे? 


जे कोणी मा.जारांगे पाटलांचे हाल बघत होते त्यांचे डोळे पाणावत होते. पत्रकार सुद्धा रडत होते. जेव्हा कोर्टातून आदेश आला की तीन वाजेपर्यंत मुंबई खाली करा तेव्हा पोलीस कर्मचाऱ्यांना त्या आदेशाच पालन करावे लागले. पण तेव्हा मराठा बांधव बोलत होते, "आम्हाला रेल्वे स्टेशन वर बसून देत नाहीत, रस्त्यावर पण नाही, पाऊस आला तर कुठे बसणार?" तेव्हा मन खूप कासावीस होत होत. तेव्हा ते हात जोडून सांगायचे, "आम्हाला आरक्षण दया आम्ही पाच मिनिटात मुंबई सोडतो. तुम्हाला कोणताही त्रास न देता. फक्त आम्हाला आरक्षण द्या."


आलेले सर्व ग्रामीण भागातले होते. त्यांना मुंबईतले काही माहीत नव्हतं. शेतातून अन्न धान्न कसं पिकवायचं, शेतमाल शहरातील लोकांना कसा पुरवायचा एवढंच त्यांना माहीत आहे. 


जेव्हा आरक्षणाची घोषणा झाली तेव्हा प्रत्येक मराठा पोलीस कर्मचाऱ्यांना हात जोडून नमस्कार करत होता आणि म्हणत होता, "साहेब तुम्ही आम्हाला सहकार्य केले" खरंतर हे पोलिसांच कर्तव्य होत. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद खूप काही सांगून जात होता.


आरक्षण भेटल्याचा दुसऱ्या दिवशी आझाद मैदान परिसरात गेले तेव्हा तेथे एकही मराठा मावळा नव्हता. तेव्हा माझे डोळे भरून आले. आपली गावाकडची माणसं दिसली की खूप बरं वाटतं. त्यांची आणि आपली ओळख नसली तरी त्याचं साधं राहणीमान, साध बोलणं मनाला खूप बाहळून टाकत. माझ्या सहा वर्षाच्या अनुभवातून फक्त मराठा आंदोलनाच्या बंदोबस्तावेळी माझे डोळे भरून आले. आज त्या ठिकाणी कोणी नव्हतं प्रत्येक गोष्ट डोळ्यासमोर येत होती. - कालिंदा (साबळे) उबाळे🙏

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने