महाराष्ट्र सांगली कवठेमहांकाळ मध्ये मृदेह

 महाराष्ट्र: सांगली 8.9.2025.

कवठेमहांकाळ तालुक्यातील तिसंगी गावाजवळ घाटनांद्रे रोडवर एका २८ वर्षीय तरुणाचा दगडाने ठेचून निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि. ८ सप्टेंबर) सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मृत तरुणाचे नाव सुनील विलास शिंदे (वय २८, रा. घाटनांद्रे, ता. कवठेमहांकाळ) असे असून, तो ट्रॅक्टर चालक होता. सकाळी रस्त्याच्या कडेला त्याचा मृतदेह दिसून आला.



घटनास्थळी भीषण दृश्य

सुनीलचा मृतदेह तिसंगी येथे घाटनांद्रे रोडच्या कडेला आढळून आला. मृतदेहाजवळच एक मोठा रक्ताने माखलेला दगड सापडला असून, त्याच दगडाने ठेचून खून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मृतदेहाच्या स्थितीवरून हल्ला अत्यंत क्रूर आणि नियोजित असल्याचे स्पष्ट होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने