सामुदायिक तुळशी विवाह संभारंभ ठिकाण :- गुणसागर नगर कळवा
गुणसागर नगर नवरात्रउत्सव मंडळ आयोजित सालाबाद प्रमाणे सामुदायिक तुळशी विवाह संभारंभ रविवारी दिनांक 02/11/2024 रोजी ची. सौं. का. तुळस आणि ची. गोपाळ कृष्ण यांचा शुभविवाह. याच शुभ मुहर्तावर सायंकाळी 8:00 वाजता अर्जुन - सुभद्रा यांचा विवाह धूमधडयाकत पार पडला गुणसागर नवरात्र उत्सव मंडळ आणि स्थानिक रहिवासी यांनी पारंपरिक वेशभूषे मध्ये उपस्थिती लावली होती. गुणसागर नवरात्र उत्सव मंडळाचे अध्यक्ष सचिन विचारे, सेक्रेटरी संजय भोसले खजिनदार समीर विचारे आणिसांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख - डॉ. सुमेधा देसाई, सविता डोर्लेकर, श्रद्धा महादळकर. आणि इतर पदाधिकारी, आणि महिला पदाधिकारी यांनी विशेष मेहनत घेऊन कार्यक्रम व्यवस्थित पणे पार पाडला. सदर कार्यक्रमास मान्यवर गुणसागर फेडरेशन अध्यक्ष श्री शैलेश पोवळे आणि राजकीय मान्यवर मा. नगरसेविका सौं. मनाली पाटील,भारतीय जनता पार्टी च्या नीता पाटील, कळवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षा चे महिला विभाग संघटिका सौं. प्रतिभाताई परब, उपविभाग प्रमुख श्री.दौलत सरवणकर, शाखा प्रमुख श्री.सचिन विचारे, उपशाखाप्रमुख श्री.प्रकाश मोहिते,श्री.समीर विचारे, उपस्थित होते. *महाराष्ट्राचा नवा संवाद न्यूज सोबत प्रतिनिधी दौलत सरवणकर आणि कॅमेरामन गणेश दळवी.*
